मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

व्याख्याते संपर्क क्रमांक

14 एप्रिल ह्या दिवसापासुन
जगभर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. त्याकरीता

प्रबोधनकार वक्त्यांची यादी...
 आपल्याकरीता देत आहे.
डीजे डॉल्बी लाउन लोकांचे प्रपंच करण्यापेक्षा प्रबोधनाचे कार्यक्रम घेवुन प्रबुद्ध भारत घडविण्याचे कार्य करु. हेच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन असेल....💐

दादाभाऊ अभंग, मुंबई
09702845000
अरुण जावळे
09822415472
शिवाजीराजे पाटील, नांदेड
07875977555
पुरूषोत्तम जाधव, बीड
09423716354
प्रा. सुदर्शन तारख, जालना
09823506907
संदिप निर्मळ, बुलढाना
09890988192
महादेव सुकाळे, शेगाव
09850186975
शिवाजी भोसले, अकोला
09689964143
अर्जुन सुर्वे, अकोला
09130217296
शुभम् टाके, सेलू
07066312731
विकास पाटिल, कोल्हापुर
09881172889
संजीव साठे, औरंगाबाद
09422488986
शिवदास शिंदे, नांदेड
09822986003
कैलाश शिंदे, नांदेड
09922794464
श्रीकांत ठाकरे, वाशिम
09527555671
कृष्णा काळे, नांदेड
08275352284
संजिव सोनवणे, जळगाव
09823457964
अर्चना कोल्हे, बुलढाणा
09028621750
लक्ष्मीकांत कोलते, औरंगाबाद
09421691863
मनोहर पाटिल, धुळे
09623336924
डी.एल. कदम, धुळे
08605841086
वैभव भिवरकर, वाशिम
09422785707
परमेश्वर पाटिल, परभणी
09403109101
सविता मोरे, वाशिम
09420839102
राजनारायण जाधव, धुळे
09421532122
प्रदीप ढगे, लातुर
09823283444
प्रा. डॉ. एस. एम. सोनोने लातूर.
9028694891
गजानन बिरादार, लातुर
09823203846
चेतन पावडे, चंद्रपुर
09423089419
शंकर कदम, नांदेड
09766032907
राजकुमार कर्हाळे, हिंगोली
09881403765
गजानन जाधव, नांदेड
09767460224
धनंजय पाटिल, औरंगाबाद
08275520397
प्रकाश डुबरे, नाशिक
09766403791
सुनील सातव, बुलढाणा
07263253266
राजेश होळकर, नाशिक
09637568906
अजय भुजबळ, परभणी
08180941255
राम चव्हाण, बीड
09975663007
मयुर बिराजदार, ऊमरगा
07038619628
शुभम् गाडगे, पुणे
08805260889
श्रीकांत बरिंगे, अकोला
09673897440

प्रा. चंद्रशेखर गायकवाड अकलुज  सोलापुर 9890691776
शाहीर राजेंद्र कांबळे अकलुज  सोलापुर 9970986788

डाँ. आ.ह.साळुंके सर, सातारा
09420627211
डाँ. निर्मला पाटिल, सांगली
09822725678.                                
प्राचार्य दशरथ सटवा वाघमारे मो. 8806021811, जत , सांगली.                                              
डाँ. छायाताई महाले
09763357322
मा.म.देशमुख, नागपुर
09422118219
प्रा. प्रभाकर पावडे
09421804842
प्रा. जेमिनी कडु
09422808688
डाँ. अशोक चोपडे
09420065825
डाँ. चंद्रशेखर चांदेकर
09423781114
लीना निकम
08275217294
प्रदिप शेंडे
09422541945
संजय शेंडे
09860459183
सचिन विजय कांबळे
9168021193
ताडीवाला रोड , पुणे
चंद्रप्रकाश देगलुरकर, नांदेड
09423171532
प्रा. संतोष देवराये
09860820657
एम.एल. देशमुख, बीड
09049598947
प्रा. अर्जुन तनपुरे
09422338512
प्रा. दिलीप चौधरी, चंद्रपुर
08855956464
जयसिंगराव पवार, कोल्हापुर
09921112102
डाँ.जे.बी.शिंदे
09225809071
इद्रजीत सावंत
09890073877
गंगाधर बनबरे पुणे
09422346914
शाम मानव
09371014832
अँड. अनंत दारवटकर
09850560982
न्या. बी.जी.कोळसे पाटील
09822434343
यशवंत गोसावी
08446468446
कृष्णकांत भोजने
09922139296
किशोर ढमाले
09422015854
अँड. सुनिल बांगर
09850132306
किशोर मांदडे
09881980372
निलेश जगताप
08390530629
बालाजी गाडे
09623551025
प्रा. रेवती बेंद्रे, पुसद
09403492784
बळीराज धोटे, चंद्रपुर
09673337062
अँड. भगवान पाटिल
09422136309
सुधिर भोसले, चिपळुन
09890570218
सत्यपाल महाराज अकोला
सप्तखंजेरी वादक
09423128143
आमोल मिटकरी
09767826571
प्रशांत बुले, अकोला
09422920735
मार्तंड माळी
09421357082
डाँ.अशोक राणा, अमरावती
09372150158
अँड. गणेश हलकारे
09423125738
डाँ. सतीश पावडे
09372150158
प्रेमकुमार बोके
09527912706
अलगा लुंगे
09922626297
मयुराताई देशमुख
09049702407
लीलाधर पाटिल, जळगाव
09405058533
प्रदिप देसले
09422842017
संजय सोनवने
09823457964
रामचंद्र पाटिल, बुलढाणा
09423487463
सचिन पाटिल
09604741383
प्रा. नुतन माळवी, वर्धा
09625222427
इंजि. भाऊ थुटे
09422123982
शिवराज महाराज, पंढरपुर
09850552999
बद्रीनाथ महाराज तनपुरे
02186-223123
अमरजीत पाटिल
09850981009
ऊज्ज्वला तांबे शिरवड
09850120586
चंद्रशेखर शिखरे औरंगाबाद
09423603650
अँड.वैशालीताई डोळस
09423387248
रामदास वाघमारे औरंगाबाद संपादक जीवन गौरव
8888125610
डाँ. साहेब खंदारे, परभणी
09766315305
नितीन सावंत
09970744142
डी.डी.गोर्डे आण्णा, नाशिक
06420903530
सचिन भोजणे ,जून्नर
9130217065
प्रा. नामदेवराव जाधव, मुंबई
09869649737                                    नवनाथ शिंदे पुणे                         09860748083
राहुल वाकुङे (पुणे)
7798954556
डाॅ प्रितीश जळगावकर मुबंई
7045954907/ 9004321983
राजाराम खरात -9870130317
भीमराव जयवंत गाडे
  *9527876946*
संदीप ढाकणे औरंगाबाद सहसंपादक जीवन गौरव
+917588512467
हि सर्व मंडळी प्रबोधना साठी येणार आहेत आजच वेळ घ्या. क्रांतिकारी जय भिम.

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

गझल

अशी ये...
अशी ये जसा चांद काळोख राती
दिवे लागणीला जणू कैक वाती

मनाशी मनाचे दुवे सांधताना
जळाव्यात माझ्या तुझ्या लाख जाती

कशाला हवा चांदण्यांचा बिछाना
तुला लोळण्याला मऊ पाक छाती

जरी पावसाने भिजावी धरा ही
तुझ्या पावलांनी शहारेल माती

फुलांचे जसे ताटवे बांधलेले
अता घट्ट व्हावी घरातील नाती

खुळी पापणी काठ ओलावलेली
सुन्या सांजवेळी तुझे गीत गाती

मला वादळांची तमा काय भीती?
लढाया पुरे हात हातात हाती

मला दान दे काळजाच्या कुपीचे
तुटो बंध सारे गळो कूळ याती
:::::::::::;;;;;;;;;;
कवी किरण अहिवळे
मु.पो. सोमंथळी
ता. फलटण, जि. सातारा
मो.नं.७३०४७५६३६८

गझल

आता...
लावते झुंजावयाला भाकरीची कोर आता
फाडते देहास माझ्या वासनेची बोर आता

काजव्यांनी काल राती चांदण्यांशी बंड केले
कावळ्यांनी नाचणारे ठार केले मोर आता

बोकडांना चाप देण्या काढले मोर्चे कितीदा
भोगली जाते नव्याने रोज माझी पोर आता

जाहले स्मशान आता स्वप्न रानी पेरलेले
जीवनाशी वैर माझे मित्र झाला दोर आता

का खुडावे या कळ्यांना जन्मण्या आधी जगाने
हिंडती भुंगे हजारो मायबापा घोर आता

बाप माझा ढाल आहे संकटांना झेलणारा
वादळांनाही पुरेसा राहिला ना जोर आता

टेबलांना पोखरावे लाचवेड्या वाळवीने
शासनाने पोसलेले कोडगे हे चोर आता
::::::::::::::::::::::;;;;;
कवी किरण अहिवळे
मु.पो.सोमंथळी
ता.फलटण,जि.सातारा
मो.नं.७३०४७५६३६८

गझल

पिढ्यान पिढ्यांच्या तिमिरात
रुढींच्या साखळदंडात
करकचून
बांधला गेलेला समाज
विषमतेचे जोखड
निमूटपणे
मानेवरती ओढत होता
मळकटलेल्या,कळकटलेल्या
पिळदार देहावरती
बुरसटलेल्या
मनुवादी विचारांचा
झाडू आणि मडकं घेऊन
स्वत:च्या सावलीलाही
लपवत होता
जगण्याची परिभाषाच
अजून ज्याला उमगली नाही
त्यांना स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्यायाची व्याख्या कोठून कळणार??
कोण समजाऊन सांगणार??
गावकुसाबाहेर
आपला
तोडका मोडका संसार थाटलेला
गुलामगिरीच्या रहाटगाडग्यात पिचलेला समाज
प्रकाशापासून
अजूनही
कोसो दूर खितपत होता
आणि एक दिवस...
भिमराव नावाचा
"प्रद्न्यासूर्य"
क्रांतीचे तेज घेऊन
उगवला
एवढा दैदिप्यमान
प्रखरता आणि तितकीच नैतिक मूल्यांची शितलता असणारा सूर्य
आम्ही पहिल्यांदाच पाहिला
उजळून गेला आसमंत
आणि गळून पडली
गुलामगिरीची लक्तरं
तूटून पडले साखळदंड
आणि हातात पेन
पाठीवरती आली दप्तरं
सगळीकडे निरोगी प्रकाश
आणि फक्त निखळ
 प्रकाशच पसरला होता
हक्काचं क्षितिज
हक्काचा सूर्य
हक्काचा प्रकाश
आणि मनोधैर्य
बाबा,
संघर्षाचा एक अखंड
अध्यायच बनलास
शेवटच्या श्वासापर्यंत
आमच्यासाठी
चिरंतन तळपत राहिलास
मन,मनगट,आणि मेंदूमध्ये स्फुर्तीचं स्फुल्लिंग चेतवलंस
स्वाभिमान आणि जगण्याचा आत्मविश्वास दिलास
हे बुद्धितेजा,
तुझ्या अथांग द्न्यानाने
आता सकल पृथ्वी
शाश्वतपणे निरंतर
उजळत राहिल
:::::::::::::::::
कवी किरण अहिवळे
मु.पो.सोमंथळी
ता.फलटण,जि.सातारा
मो.नं.७३०४७५६३६८

शुक्रवार, २४ मार्च, २०१७

वृत्त-देवप्रिया/कालगंगा
      गझल
::::::::::::::::::::::::::::::::
पत्थरांचे देव झाले
माणसांची पत्थरे
माकडांचा गाव येथे
भावनांची लक्तरे

जाणिवांना,नेणिवांना
भोग आता भोगतो
भावभक्ती ना कळे ही
सोहळे आसक्त रे

धर्म,जाती,पंथ,गोत्रे
जानव्यांचे चोचले
सोंगडे पंचांग, पोथी
चोरट्यांची दप्तरे

श्वास द्यावे,श्वास घ्यावे
माणसाने माणसा
हात हाती देत सारी
संपवावी अंतरे

या धरेने,या तरूंनी
दूर कोणा लोटले ?
जागवावे अंतरंगा
सांडताना रक्तरे

जन्म जावा शोधण्याला
का जगू ? कोणासवे ?
जीवनाच्या काळराती
सापडावी उत्तरे
::::::::::::
कवी किरण अहिवळे
फलटण,जि.सातारा
मो.नं.७३०४७५६३६८
वृत्त-व्योमगंगा
:::::::::::::::::::
  गझल
:::::::::::::::::::::::
चिंब या डोळ्यात वेड्या
पावसाचे भास होते
कोरड्या त्यांच्या घशाला
सावकारी फास होते

पाहिले ज्यांनी कधी ना
बांध,वाफे पांढरीचे
पांढर्या वेशात त्यांचे
रोज दौरे खास होते

लागते ना झोप आता
चांदण्यांची फार भीती
रोज राती शोषणारे
ते विखारी डास होते

मांडण्याला गाव त्यांचा
छाटली झाडे कितीदा
भान त्यांना का नसावे?
पालवीला श्वास होते

राम कोणा पाहिजे जो
जाळतो सीता अजूनी
भावनांचे कोंडवाडे
वाढणारे मास होते

जाहली वांझोट माती
सेझच्या आलिंगनाने
पाखरा,लोकास पोटी
पोसणारे घास होते

कोणता हा देश आहे ?
कोणती ही लोकशाही ?
श्वास घेण्या वाव नाही
ते पिढ्यांचे दास होते

::::::::::::::::::::
कवी किरण अहिवळे
फलटण जि.सातारा

मंगळवार, ७ मार्च, २०१७

मुलीनं जन्माला यायचं...कविता

मुलीनं जन्माला यायचं म्हटलं तर
येतानाच काळजावरती
दगडाचं ओझं ठेऊन यावं लागतं
डोळे असून नसल्यासारखे
वाचा असून नसल्याचं
आभासी जगावं लागतं
तसं चुलीचं आणि मुलीचं
जीवाभावाचं नातं
पूर्वीपासून जपलेलं
जे आयुष्यभर जातं

म्हणे..
मुलगी म्हणजे
ऊरावरचा भार
नुसती बिलामत
डोक्याला कार
पोटतच मेली असती
तर बरी झाली असती
पण येड्या
मुलगीच नसती
तर तुझी जिंदगी
कुठुन आली असती??

मुलीचं आयुष्य म्हणजे
काचेचं भांडं
ते नीट जपावं???
मुलगी वस्तू..??????????

अग्नीपरिक्षेचं माप
नेहमी तिच्याच पदरात
जीवन देण्याचं..जगविण्याचं
जरी भाग्य तिच्या उदरात

ती उदराने उद्धारते जगाला
ती पदराने सुखावते जगाला
रक्ताच्या कणाकणाने
ती फुलविते जगाला
सार्या ताणातून विसावा बनून
मायेच्या कुशीत झुलविते जगाला

म्हणे..
उपभोगाचीच वस्तू ती
स्वातंत्र्याचं तिला काय देणंघेणं
परक्याचं धन
तिला कुठलं आलंय मन ?
तिनं फक्त द्यायचं
घ्यायचं तिच्या मनात नसावं
तिच्यासाठीच कोंडवाडे बांधलेत
तिनं उंबर्याच्या आतच असावं
मात्र.....
आता परिस्थिती बदललीय
काळही बदललाय
सारं काही न्यू ऍन्ड बोल्ड
समाजही सुधारलाय
हो खरं आहे
समाजमन सुधारलंय
मुलींवरती होणार्या अत्याचारांचं
स्वरुप मात्र बदललय

आता मशिनींमुळं
गर्भाशयातच
नरडीला नखं लावतात
आरडओरडायची कटकट नको
थोडे पैसे मात्र लागतात
पण जाऊ दे
गेली एकदाची बिलामत

कोंडवाड्यातील अत्याचारांचा
आवाज आता
रस्त्यावरती येतो
चारचौघे लुटतात तिला उघड्यावर
आमच्यातला मनू मात्र
त्याचं कशाला टेन्शन घेतो

तिला जाळलं जातं
तिला टाळलं जातं
रुढीपरंपरांच्या घाण्यात
तिला राजरोसपणे गाळलं जातं

आज मुलगी
दावणीतून
सुटली आहे समाजाच्या
खांद्याला खांदा
खुर्चीला खुर्ची लावुन
काम करतेय पुरुषाच्या

आता पूर्वीपेक्षा
जास्त महत्व आहे
तिच्या मताला
आता पुर्वीपेक्षा
जास्त गर्दी असते
तिच्या मयताला

सावित्रा...
तुझ्या कष्टाला  फळ आलं बघ
परंतू
तुझी लेक सुरक्षित आहे का ?
तोडून गेली तुझी मुलगी
पायातले
पिढ्यान् पिढ्यांचे साखळदंड
मात्र ती गेलीय
आणि
येईल रात्री अपरात्री व्यवस्थित
याबद्दल तू निश्चिंत आहेस का????????
तिच्या हक्काचं क्षितिज
हिश्शाचं आभाळ
आणि तिच्या कर्तृत्वाचा
तेजोमय सूर्य
निरामय..निरोगीपणे
तळपत राहिल का???
::::::::::::::::::::::::::::::::::
कवी किरण अहिवळे
मो.नं.७३०४७५६३६८